अजित पवार गटाचे अहिल्यानगरचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुण्याच्या तब्बल ९ कोटी ८० लाख रुपयांच्या कथित आर्थिक फसवणूक प्रकरणात श्रीगोंदा पोलिसांनी ही कारवाई केली. नाहाटा यांना अटक करून पुढील तपासासाठी पुणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.याप्रकरणी राहुल मक्तेदार यांच्या तक्रारीवरून एमपीआयडी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.