समता पतसंस्थेतील शंभर बनावट खात्यांच्या प्रकरणात एसआयटीने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात समता पतसंस्थेच्या राहाता शाखेचे व्यवस्थापक मिलिंद बनकर यांना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी अशोक खरात याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. बनावट खाती उघडून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचा आरोप असून, या प्रकरणातील आणखी काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.