Special Report| कुस्तीपटू लैंगिक आरोपांमधून ब्रिजभूषण यांची सुटका, राजकीय वाद नव्याने पेटणार?

देशभरात प्रचंड गाजलेल्या महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. सहआरोपी विनोद तोमर यांचीही सुटका करण्यात आली आहे. 2023 मध्ये साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांच्यासह अनेक खेळाडूंनी उभारलेल्या आंदोलनामुळे हे प्रकरण देशव्यापी चर्चेचा विषय बनलं होतं. आता न्यायालयाच्या निकालानंतर कायदेशीर लढाई संपली असली, तरी राजकीय वाद नव्याने पेटण्याची चिन्हं दिसत आहेत.

संबंधित व्हिडीओ