मुंबई आणि डोंबिवलीत नात्यालाच काळिमा फासणारी घटना समोर आलीय. लग्नाला विरोध करून सोयरिक मोडल्याच्या रागातून एका मूकबधिर भाच्याने आपल्या मामाच्या अवघ्या एक वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्याचं समोर आलंय..कुर्ल्यातून पळवून नेलेल्या चिमुकल्याला आरोपीने डोंबिवलीतील एका बंद रिक्षात सोडून दिलं. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे बाळ सुरक्षित सापडले असून आरोपीचा शोध सुरू आहे.