अल निनोमुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली असतानाच, जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने दिलासादायक स्थिती निर्माण केली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत सध्या ८९.०८ टक्के पाणीसाठा आहे. यंदा प्रथमच रविवारी गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठ्याची नोंद झाली..समाधानकारक पावसामुळे धरणांमधील जलसाठ्यात सातत्याने वाढ होत असली, तरी मुंबईकरांवरील 10 टक्के पाणी कपात अद्याप कायम आहे. महापालिका प्रशासनाकडून धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा, पुढील काही दिवसांचा पावसाचा अंदाज आणि पाण्याचा वापर याचा आढावा घेतला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या दोन ते तीन दिवसांत 10 टक्के पाणी कपात मागे घेण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.