साधारणतः मासे, कुत्रा, मांजर अनेक जण घरात पाळतात. पण अंधेरीतल्या एका पठ्ठ्यानं चक्क अजगर घरात पाळला होता.अंधेरीच्या गुंदवलीतल्या एका उच्चभ्रू सोसायटीत ही धक्कादायक घटना समोर आलीय, वनविभागाला याची माहिती मिळताच या घरावर छापा टाकला आणि भला मोठा अजगर ताब्यात घेतलाय.