खत खरेदी करताना शेतकऱ्यांना इतर उत्पादनं खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या विक्रेत्यांविरोधात राज्य सरकारने कडक भूमिका घेतली आहे. खतांसोबत सक्तीने इतर वस्तू विकण्याच्या प्रकाराला बंदी असल्याचं स्पष्ट करत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. अशा प्रकारची तक्रार आता शेतकरी थेट व्हॉट्सअॅप आणि टोल फ्री क्रमांकावर करू शकणार आहेत.