Greece मध्ये वणव्याचं महाभयंकर रूप, आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न; 1 हजार नागरिकांचं स्थलांतर

स्पेन, फ्रान्सनंतर ग्रीसमध्येही आता वणव्यानं गंभीर रुप धारण केलंय.अग्निशमन दलाचे शेकडो जवान आग विझवण्याचे शर्थीचे प्रय्तन करत आहेत.सोमवारी अथेन्सच्या आजूबाजूच्या परिसरातील आग विझवण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले. या आगीमुळे अनेक नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय.आतापर्यंत सुमारे १ हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. तर किनारी भागातील सुमारे २५० नागरिकांना बोटीद्वारे सोडवण्यात आलंय.सध्या वाऱ्यांचा वेग मंदावत असल्यानं अथेन्सजवळील आग आटोक्यात आणण्यात यश येतंय. मात्र अटिकामधील आग अजूनही नियंत्रणा बाहेर आहे.

संबंधित व्हिडीओ