ठाणे जिल्ह्याच्या आंबिवलीतील गणेश पाटील नगरमध्ये धार्मिक कारणाच्या वादातून दोन गट आमनेसामने आल्याची घटना समोर आलीय. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून काही महिलांना बेदम मारहाण झाल्याचा आरोप आहे. या राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.