जलसंकट कायम; राज्यात 17 जिल्ह्यांमध्ये टँकरनं पाणीपुरवठा, कोणत्या जिल्ह्यात टँकरनं पाणीपुरवठा?

दरम्यान राज्यातील धरणांच्या पाणीसाठात वाढ होत असली तरी दुसरीकडे मात्र ऐन पावसाळ्यात राज्यातील अनेक भागांमध्ये टँकरनं पाणीपुरवठा करावा लागतोय. राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर विभागातील पाच आणि नागपूर विभागातील चार जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमधील काही गावे, वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.मराठवाड्यात सर्वाधिक ३९५ टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय. त्यामुळे राज्यात येत्या काळात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे वेळीच पाण्याचं योग्य नियोजन राज्य सरकारनं करणं आवश्यक आहे.

संबंधित व्हिडीओ