नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवडच्या राहुड परिसरात संशयास्पदरीत्या फेकून दिलेल्या कांद्याच्या रिकाम्या गोण्यांमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या गोण्या परराज्यातील असल्याचा दावा करण्यात येत असून, निकृष्ट दर्जाचा कांदा आणून तो नाफेड आणि एनसीसीएफच्या गोदामांमध्ये साठवला जात असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून प्रशासनाकडून चौकशीची मागणी होत आहे.