बीड आणि जालन्यात बंजारा समाजाचा भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येनं बंजारा समाज सहभागी झाला होता.बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जनआक्रोश मोर्चा निघाला. जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. शहरातील मम्मा देवी चौकातून हा मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात बंजारा वेशभूषेत महिला भगिनी सहभागी झाल्या आहेत.हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातुन आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी बंजारा समाज बीडमध्ये रस्त्यावर उतरतला. तिकडे हिंगोलीत मात्र आदिवासी मोर्चा निघाला आहे. बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण मिळू नये या मागणीसाठी आदिवासी समाजानं आंदोलन केलं.