Solapur| अक्कलकोटच्या बोरी नदीच्या परिसरात पूरपरिस्थिती,रुग्णांना बैलगाडीतून दवाखान्यात नेण्याची वेळ

मागील काही दिवसाच्या मुसळधार पावसामुळे सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदी परिसरातील गावात पूरजन्य परिस्थिती.बोरी नदीच्या पूरपरिस्थितीमुळे गावातील मार्ग बंद झालेत. पुराच्या पाण्यात रुग्णांना स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय.पुराच्या पाण्यामुळे रुग्णवाहिका गावातून पोहोचू न शकल्याने रुग्णांना गावातील ओढ्यावरचा पूल बैलगाडीने पार करावा लागतो. गावातील वृद्ध महिलेला दवाखान्यात जाण्यासाठी गावात रुग्णवाहिका पोहोचत नसल्याने नागरिकांनी बैलगाडीने रुग्णवाहिक पर्यंत नेले. अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी गावात ही विदारक स्थिती पहायला मिळतेय.

संबंधित व्हिडीओ