जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी परिसरात दुपारपासून ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू आहे.सातगाव डोंगरी गावात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. घाटनांद्रा शिवारातही झालेल्या जोरदार पावसामुळे दगडी नदीला पूर आलाय.त्यामुळे सातगाव डोंगरी हे अर्धेगाव जलमय झाले आहे. तर गावाजवळील डोंगरी धरणदेखील ओव्हरफ्लो झाले असून,शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असुन यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे देखील नुकसान झाले आहे.