वाशिम, रिसोड आणि मालेगांव शहरासह तालुक्यातील अनेक गावांना विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे.अगोदरच अति पावसाने सोयाबीन,तूर,कपाशी या खरीप पिकांचे तसेच भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले असतांना आज त्यात पुनः या अति मुसळधार पावसाची भर पडली.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला आहे.