मराठा समाजाला ओबीसी मधून मिळणाऱ्या आरक्षणाच्या संदर्भात राज्यातील माळी समाजाची पंढरपुरात चिंतन बैठक संपन्न झाली. राज्यातील 27 जिल्ह्यातून माळी समाजाचे पदाधिकारी पंढरपुरात बैठकीला हजर होते... स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात जास्तीत जास्त माळी समाजातील उमेदवार निवडून आणण्यासंदर्भातील रणनीती या बैठकीत ठरली.. यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असणाऱ्या संघर्षामध्ये माळी समाजाने आगामी निवडणुकीची तयारी केलेली दिसतंय.