पश्चिम राजस्थानातून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असून त्याचा प्रभाव महाराष्ट्रातही जाणवू लागलाय. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात परतीचा पाऊस सक्रिय झाला असून अनेक भागात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. रायगड आणि पुणे घाटमाथ्यावर आज पावसाचा रेड अलर्ट आहे.. मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सातारा, घाटमाथासह छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड मध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून उर्वरित महाराष्ट्रात येलो अलर्ट आहे... पुढील दोन दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार असून ठिकठिकाणी हवामान खात्याने अलर्ट दिले आहेत. त्यानंतर पावसाचा जोर कमी होणार असून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे....