रोहित पवारांनी अंजली दमानियांना खोचक टोला लगावला आहे. दमानियांचे पती सरकारच्या थिक टँकवर असून दमानिया कुटुंबाचे आर्थिक-सामाजिक कॉम्बिनेशन महत्वाचे, असं रोहित पवार यांनी फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे. अनिश दमानिया 'मित्रा'च्या मानद सल्लागारपदी आहेत. दरम्यान याबाबत आम्ही अंजली दमानिया यांच्याशी संवाद साधला तर आता काहीही बोलणार नाही उद्या सविस्तर बोलेन असं त्यांनी म्हटलंय