बीड जिल्ह्यात बोगस लग्न लावून देणारी टोळी समोर आली आहे. या पूर्वीही ग्रामीण भागातील अनेक तरुणांची फसवणूक या बोगस लग्न लावणाऱ्या टोळीने केली आहे. मात्र असाच प्रकार बीडच्या उमापूर गावातून समोर आला असून नवरी एक अन् नवरदेव अनेक असे म्हणण्याची वेळ आली आहे. उमापूर येथील एका युवकाची बोगस लग्न लावणाऱ्या टोळीने लाखो रुपयांची फसवणूक केली. एकाच मुलीचे अगोदर आठ मुलांसोबत लग्न लावण्यात आले. मात्र पैशासाठी पुन्हा उमापूर येथील नवव्या नवरदेवा सोबत एजंटकडुन लग्न लावून देण्यात आले. या दरम्यान लाखो रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी बीडच्या चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पीडित नवरदेवाने पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत न्याय मागितला आहे.