बीडच्या धारूर येथे बाजारासाठी आलेल्या ऊसतोड मजुराचं चार जणांनी अपहरण केलं.या मजुराला घेऊन जाताना या चार जणांपैकी एकाने आडसकर साहेबांची भेट घालून याला सोडून देतो असे सांगितले होतं.तेव्हापासून हा मजूर गायब आहे.. दिनकर मैंद असे या ऊसतोड मजुराचे नाव असून त्यांच्या पत्नीने आता धारूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली आहे.यावरून चार अज्ञातांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.या दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा साखर कारखानदार रमेश आडसकर यांची एक ऑडिओ क्लिप देखील समोर आली