नाशिकच्या नाशिकरोड परिसरात असलेल्या स्टार मॉलला भीषण आग. स्टार मॉल मध्ये मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल.अचानक आग लागल्याने रुग्णांसह डॉक्टरांची धावपळ. आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू. रुग्णांना हलविण्याचे अग्निशमन विभागाकडून प्रयत्न सुरू.आग बघण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केल्याने आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाला येत आहे अडथळा.सुदैवाने या आगीत अद्याप कुठलीही जीवितहानी नाही.