शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी सुरू असल्याने नागपूर जिल्ह्यातील ६३२ शिक्षकांना गेल्या चौदा महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. गेल्या मार्चपासून चौदा महिने झाले तरी अद्याप या शिक्षकांचे वेतन झालेले नसल्याने त्यांना मिळेल ते काम करावे लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे अनेक शिक्षकांना ऑनलाइन डिलिव्हरी, फूड डिलिव्हरीसारखी कामे करावी लागत आहेत. पाहूया यासंदर्भातील विशेष वृत्तांत.