Nasarapur च्या आरोपीला हालहाल करत संपवावं; Raj Thackeray यांच्या विधानावर असीम सरोदेंची प्रतिक्रिया

पुण्यातील नसरापूर प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबीयांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया पुरावे म्हणून वापरले जाणार आहेत.पुणे ग्रामीण पोलिसांकडून आरोपीच्या कुटुंबीयांनी दिलेली प्रतिक्रिया न्यायालयात सादर केली जाणार आहे. कुटुंबीयांनी आरोपीला कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली होती. त्यामुळे कुटुंबाने दिलेली प्रतिक्रिया पोलिसांसाठी मोठा पुरावा आहे. नसरापूरमध्ये चिमुरडीवर अत्याचार करुन तीला ठार मारणाऱ्या आरोपीला हालहाल करुन संपवा अशी मागणी राज ठाकरेंनी केलीय. या घटनेने शब्दशः मनाचा थरकाप उडाला आणि भयानक चीड आली असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. महाराष्ट्राचं 'लक्ष' आणि 'लक्ष्य' विचलित झालं आहे... आणि कोणाचाच कोणाला धाक उरलेला नाही. विचलित झालेलं 'लक्ष' आणि भरकटलेलं 'लक्ष्य' पुन्हा ताळ्यावर आणण्यासाठी जे काही करावं लागेल ते सरकारने तातडीने करावं अशी मागणीही राज ठाकरेंनी केलीय.राज ठाकरे यांचं विधान बेकायदेशीर-असीम सरोदे.'अशी विधानं करणं म्हणजे कायद्याचा अनादर आहे',राज ठाकरेंच्या विधानावर असीम सरोदेंची प्रतिक्रिया

संबंधित व्हिडीओ