Beed| मानवतेला काळीमा फासणारी घटना; जुगाराच्या अड्ड्याला विरोध केल्यानं महिलेच्या गुप्तांगावर मारहाण

बीडच्या पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रंजेगावात मानवतेला काळीमा फासणारी क्रूर घटना समोर आलीय... जुगाराच्या अड्ड्याला विरोध केल्याच्या कारणावरून एका महिलेला अमानुष मारहाण करण्यात आलीय.. या प्रकरणात आरोपी निखिल आबूज आणि त्याच्या चार ते पाच साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. संबंधित आरोपी वाल्मीक कराडचा समर्थक असल्याची माहिती मिळत असून त्याचे वाल्मीक कराडसोबतचे फोटोही आता समोर आलेत... दरम्यान, या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या महिलेवर सध्या बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असला तरी आरोपींना अजूनही अटक करण्यात आलेली नाही..

संबंधित व्हिडीओ