गुजरातच्या सुरतमध्ये एक भीषण अपघात झालाय.. सुरत जिल्ह्यातील बार्डोली जवळून जाणाऱ्या सुरत- धुळे महामार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या दोन बसचा अत्यंत भीषण अपघात झालाय.. हा अपघात इतका भयानक होता की, धडकेनंतर एक एसटी बस थेट महामार्गावर उलटली आणि क्षणार्धात बसला भीषण आग लागली.. या आगीत सात प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला.. तर 15 हून अधिक जण जखमी आहेत.. यातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जातीय.. MH-18-BZ-1258 आणि MH-20-BL-3390 असे या बसचे पासिंग क्रमांक आहेत.. या दोन्ही बस सूरतमधून पालघर आणि सातपुऱ्याला येत होत्या..त्यावेळी ओव्हरटेक करताना नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला...