Jalgaon| 12 वर्षीय गणेश पाटील मृत्यू प्रकरणाचं गूढ उकलणार; अडीच महिन्यांपूर्वी मृत्यू,आता शवविच्छेदन

अडीच महिन्यांपू्र्वी झालेल्या मृत्यूनंतर आता मुलाचं शवविच्छेदन करण्यात येणार आहे... जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातल्या रेल या गावात बारा वर्षीय गणेश पाटील या मुलाचा क्रिकेट खेळताना बॅट लागून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.. अकस्मात मृत्यूमुळे कुटुंबीयांनी मृत गणेशचा दफनविधी करत अंत्यसंस्कार केला होता मात्र मुलाचा मृत्यू हा अकस्मात नसून घातपात असल्याचा संशय वडिलांना आल्याने त्यांनी याप्रकरणी पोलिसात धाव घेतली.. मात्र पोलिसांकडून दखल घेतली जात नसल्याने अखेर नवल पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या प्रकरणाचे सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले...

संबंधित व्हिडीओ