शिवसेनेच्या आजवरच्या राजकारणात आक्रमक ठरलेली एक घोषणा म्हणजे खान हवा की बाण हवा.शिवसेनेनं गेल्या कित्येक वर्षांपासून याच घोषणेमधू ध्रुवीकरण घडवून आणलं... आणि संभाजीनगर, परभणीमध्ये दबदबा निर्माण केला... गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत ठाकरे गटानं रशीद मामूंना उमेदवारी दिली... तेव्हा एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर हिंदुत्व सोडल्याची सातत्यानं टीका केली.आता त्याच एकनाथ शिंदेंनी परभणीमध्ये सईद खान यांना उमेदवारी दिलीय.... त्यामुळे शिंदे बोलतात एक आणि करतात भलतंच... अशी टीका होतेय.