Beed| विलास घुले हत्याप्रकरण | पोलीस अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर कुटुंबियांचं आंदोलन स्थगित

विलास घुले यांच्या हत्या प्रकरणात आरोपीवर कारवाई करावी या मागणीसाठी सकाळपासून पाण्याच्या टाकीवर चढून सुरु असलेलं आंदोलन स्थगित करण्यात आलं... बीडच्या केज तालुक्यातील टाकळी इथं हे आंदोलन करण्यात आलं.. पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता स्थगित करण्यात आले... विलास घुले यांचे भाऊ रमेश घुले तसेच घुले कुटुंबातील महिला देखील या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या तर गावकऱ्यांनी पाण्याच्या टाकीजवळ ठिय्या सुरू केला होता.. याबाबतची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी दाखल होत कारवाईचे आश्वासन दिले.

संबंधित व्हिडीओ