१ जुलैपासून राज्यात सर्व वाहनांसाठी एचएसआरपी नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आलीय. मात्र, असे असतानाही अनेक सरकारी वाहनांवर अद्याप एचएसआरपी नंबर प्लेट नसल्याचे एनडीटीव्ही मराठीच्या पाहणीत समोर आलेय. एकीकडे सर्वसामान्य वाहनधारकांवर कारवाई होत असताना केंद्र सरकारच्या अधिकृत वाहनांना हा नियम लागू होत नाही का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी.