महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी सकाळी ‘भीमांजली’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम पार पडणार आहे.. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि कार्याला शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून अभिवादन करण्यात येणार आहे. दादरच्या रवींद्र नाट्यमंदिरात देशातील नामवंत कलाकारांच्या सहभागातून बाबासाहेबांना स्वरांजली अर्पण केली जाणार आहे.