पुणे शिवाजीनगर कोर्ट परिसरातील गोळीबार प्रकरणातील सहा आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आलीय... या गोळीबार प्रकरणात एकूण सात आरोपींना अटक करण्यात आलीय.. त्यातील सहा आरोपींना कोर्टाने 2 डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावलीय.. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 9 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झालाय.. त्यापैकी सात आरोपींना अटक करण्यात आलीय... दरम्यान, पुणे पोलिसांकडून आणखी दोघांना अटक करण्यात आली.. त्यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे..पुणे गोळीबार प्रकरणात तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात वापरण्यात आलेलं पिस्टल 15 दिवसांपूर्व मध्यप्रदेशातून आणण्यात आलं होतं. पिस्टलसाठी आरोपींना 50 हजार रुपये मोजले होते. यासाठी ज्ञानेश्वर कोंडे याला पैसे देण्यात आल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. मंदार किवळेवर हल्ल्याची रणनीती आधीच ठरली होती. मात्र परवा अक्षय चव्हाणच्या घरी शेवटची बैठक झाली. फिर्यादी न्यायालयात येणार असल्याची माहिती आधीपासूनच असल्याने हा हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा संशय तपास यंत्रणा व्यक्त करत आहेत.