4 तारखेच्या शेतकरी मोर्चावर Rohit Pawar ठाम, मोर्चाबाबत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे काय म्हणाले ?

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ४ तारखेला होणाऱ्या शेतकरी मोर्चाबाबत ठाम भूमिका घेतली आहे.जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत त्यांनी शेतकरी प्रश्नांवरच लक्ष केंद्रित करण्याचा आग्रह धरला. मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या प्रभावीपणे मांडण्यावर भर देण्यात आला. दरम्यान, रोहित पवार शेतकरी मोर्चाबाबत आक्रमक भूमिका घेत असताना पक्षश्रेष्ठींनी मात्र अद्याप मौन बाळगलं आहे.. मोर्चात सहभागी होण्याबाबत पक्षाकडून कोणतीही अधिकृत सूचना देण्यात आलेली नाही.. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी संभ्रमात असल्याचं चित्र दिसून येत आहे.

संबंधित व्हिडीओ