संसदेचं विशेष सत्र 30 नोव्हेंबर आणि 2 डिसेंबरला. संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांचं ट्विट. 30 नोव्हेंबरला लोकसभेचं, 2 डिसेंबरला राज्यसभेचं कामकाज. विशेष अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडणार? दरम्यान, महिला आरक्षण कायदा लागू करण्यासाठी अधिवेशन बोलवले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक संसदेत आणले जाऊ शकते अशी चर्चा आहे. परिणामी, दोन्ही सभागृहांचे अधिवेशन या विधेयकाशी जोडले जात आहे. परंतु, सरकारने अद्याप या विधेयकाचा बैठकीच्या कार्यसूचीत समावेश केलाय का याची माहिती दिलेली नाही