Nashik Firing | निफाड तालुक्यातील नैताळेमध्ये गोळीबार; श्रावण पिंपळे जखमी, संशयित आरोपी फरार

नाशिकच्या निफाड तालुक्यातील नैताळे गावात भरदिवसा गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात श्रावण सुरेश पिंपळे हे गंभीर जखमी झाले आहेत. संभाजीनगर येथील एका गुन्ह्याच्या संदर्भात चर्चा सुरू असताना गावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, गोळीबारानंतर संशयित राहुल वाघमारे फरार झाला असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.

संबंधित व्हिडीओ