नवी मुंबईत BJPची भव्य तिरंगा रॅली; Ganesh Naik यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित

नवी मुंबईत भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.वाशीतील ब्लु डायमंड हॉटेलपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही रॅली पार पडली.या रॅलीत मंत्री गणेश नाईक यांच्यासह नवी मुंबईतील भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आणि भारतीय सैन्याच्या मनोबल वाढीसाठी देशभरात भाजपकडून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईत ही रॅली काढण्यात आली.

संबंधित व्हिडीओ