कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांनी दहशत माजविली आहे. कल्याणच्या गोविंदवाडी परिसरात चार जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद आहे. धक्कादायक म्हणजे कल्याण डोंबिवलीत एका दिवसात ६५ जणांना भटक्या कुत्र्यांनी चावे घेतले आहेत. त्यामुळे नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. या भटक्या कुत्र्यां केडीएमसीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांनी केली आहे.