WhatsApp च्या Username फीचरवर केंद्र सरकारचा आक्षेप; मेटाला नोटीस,3 दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश

व्हॉट्सअॅपच्या प्रस्तावित ‘Username’ फीचरवर केंद्र सरकारने गंभीर आक्षेप नोंदवला आहे. या फीचरबाबत केंद्राने मेटाला नोटीस बजावत तीन दिवसांत सविस्तर माहिती आणि स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, या विषयावरील सरकारी सल्लामसलत पूर्ण होईपर्यंत भारतात हे फीचर लागू करू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, Telegram प्रमाणे या फीचरचा गैरवापर होण्याची शक्यता सरकारने व्यक्त केली असून यावर तीव्र नाराजीही नोंदवली आहे. ‘Username’ फीचरमुळे मोबाईल क्रमांक न शेअर करता केवळ युजरनेमच्या माध्यमातून संपर्क साधणे शक्य होणार होते. व्हॉट्सअॅपवरील गोपनीयता अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने हे फीचर प्रस्तावित करण्यात आले होते.

संबंधित व्हिडीओ