महायुती समन्वय समितीची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार असून महायुतीतील सर्व घटकपक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराबाबत तसेच राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर या बैठकीत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.यासोबतच विधिमंडळातील सदस्यांची उपस्थिती आणि समन्वय यासंदर्भातील मुद्द्यांवरही चर्चा केली जाणार आहे.या बैठकीला सुनील तटकरे, छगन भुजबळ, चंद्रशेखर बावनकुळे, प्रसाद लाड, शंभुराज देसाई, दादा भुसे, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ आणि सदाभाऊ खोत यांच्यासह महायुतीतील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. बैठकीतील निर्णयांकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.