नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात पीक कर्ज वाटपात पिछाडीवर असलेल्या काही खाजगी बँकांविरोधात आता आर्थिक बहिष्काराचं अस्त्र उगारण्यात आलंय. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज न देणाऱ्या बँकांची शासकीय खाती बंद करण्याचा इशाराच दिलाय. बावनकुळेंच्या या भूमिकेला व्यापारी वर्गानं पाठिंबा दिलाय... बँकांचा मनमानी कारभार आणि त्यावर सरकारची भूमिका जाणून घेण्यासाठी पाहूया हा खास रिपोर्ट.