भारताचे नवे लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ यांनी त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांना गार्ड ऑफ ऑनर प्रदान करण्यात आला. जनरल धीरज सेठ हे भारताचे ३१ वे लष्करप्रमुख आहेत.याआधी १ एप्रिल २०२६पासून ते उपलष्करप्रमुखपदावर कार्यरत होते.जनरल द्विवेदी यांचा लष्करप्रमुखपदाचा कार्यकाळ ३० जून रोजी संपल्यानंतर त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. जनरल धीरज सेठ यांची कारकीर्द जवळपास ४० वर्षांची आहे.गार्ड ऑफ ऑनर स्वीकारल्यानतंर लष्करप्रमुख धीरज सेठ यांनी त्यांच्या वडिलांची भेट घेतली.लेफ्टनंट जनरल के एम सेठ, निवृत्त यांना लष्करप्रमुखांनी सल्यूट केलं त्यानंतर त्यांचे आशीर्वाद घेतले.तसंच त्यांनी त्यांचे लहान भाऊ रिअर अॅडमिरल रवनिश सेठ यांच्याही सल्यूटचा स्वीकार केला.लष्करी संस्कारात वाढलेल्या लष्करी कुटुंबातील हा भावनिक आणि अभिमानास्पद क्षण कॅमेऱ्यातही टिपला गेला