कल्याण डोंबिवलीत जोरदार पाऊस सुरू आहे.. कल्याण पूर्वेतील अडवली, ढोकली परिसरात नागरिकांच्या घरात गुडघ्यापर्यंत पाणी साचलंय.. यात नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.. वारंवार पाठपुरावा करूनही नालेसफाई झाली नाही.. याचा फटका नागरिकांना बसत असल्याचं स्थानिक शिवसेना नगरसेवक कुणाल पाटील यांनी सांगितलंय.