जपानच्या पंतप्रधान साने ताकाइची आज 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर हा त्यांचा पहिला भारत दौरा असेल. दोन जुलै रोजी त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह द्विपक्षीय बैठक होणार आहे. दोन्ही नेत्यांमध्ये होणाऱ्या 16व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सेमीकंडक्टर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऑटोमोबाइल, सप्लाय चेन आणि हिंद-प्रशांत क्षेत्राची सुरक्षा यांसारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल.