Chandrapur Rain| चंद्रपुरात पावसाची स्थिती काय? जिल्ह्याला यलो अलर्ट; स्थितीचा NDTV ने घेतलेला आढावा

पूर्व विदर्भात दमदार पावसाने वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदी दुथडी भरून वाहत असून पुलावरून पाणी वाहू लागल्याने गडचांदूर मार्गावरील भोयेगाव मार्ग मागील ४ दिवसापासून बंद आहे. पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहनाच्या रंगाच्या रांगा लागल्या आहेत. या पुराने शेकडो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आले. कोरपना, जिवती, राजुरा, चंद्रपूर व बल्लारपूर तालुक्यांतील पिकांना मोठा तडाखा बसला. सावली तालुक्यात ३६ घरे व चार गोठ्यांचे अंशतः नुकसान झाले. नाल्यांना पूर आल्याने जिल्ह्यातील १८ मार्ग बंद झाले आहेत. इरई नदीला वर्धा नदीचे बॅक वॉटर आल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. संततधार पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. १४ शे हेक्टर क्षेत्रातील पाइक पाण्याखाली आहे. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी आज 'येलो अलर्ट'चा इशारा दिला आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक भटपल्लीवार यांनी

संबंधित व्हिडीओ