मुंबईत सलग चार दिवसांनी आज पावसाने काहीशी उसंत घेतलीय. मात्र अजुनही पावसाचा धोका टळलेला नाही. गेल्या दोन महिन्यात जितका पाऊस झाला नाही.. त्याहून जास्त पाऊस फक्त चार दिवसात कोसळलाय.. या पावसामुळे मुंबईची वाहतूक ठप्प झाली. कामासाठी घराबाहेर पडलेल्यांची फरफट झाली. घरांमध्ये पाणी शिरलं.. काही भागात तर अजुनही पाणी ओसरलेलं नाही.मुंबईकरांची आजची परिस्थिती काय आहे पाहुयात..