देशाात ऑनलाईन सट्टाबाजी ही सर्रासपणे सुरु आहे. गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन सट्टेबाजी सर्रासपणे सुरु असलेली बघायला मिळत आहे. तसेच या मोठमोठ्या ऑनलाईन सट्टेबाजीच्या अॅप्सची मोठमोठ्या अभिनेत्यांकडून जाहिरात करण्यात येत होती. अनेकांकडून वारंवार यावर बंदीची मागणी केली जात होती. अखेर केंद्र सरकारने याबाबतच्या तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे. आता या ऑनलाईन गेमिंगवर कायमची चाप बसणार आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारचे सेवा प्रदान करणाऱ्यांना आता आगामी काळात तब्बल 1 कोटींचा दंडही आकारला जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून आज लोकसभेत ऑनलाईन गेमिंग संबंधित एक विधेयक मांडण्यात आलं. हे विधेयक मंजूर देखील करण्यात आलं. पैसे लावून खेळल्या जाणाऱ्या ऑनलाईन गेमवर प्रतिबंध लावण्याशी संबंधित हे विधेयक आज लोकसभेत मंजूर करण्यात आलं. ऑनलाईन गेम्सचं व्यसन, आणि आर्थिक फसवणूक यांवर आळा बसावा यासाठी हे विधेयक आणण्यात आलं आहे.