दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर बुधवारी सकाळी त्यांच्या घरातच हल्ला झाला. दिल्ली बाहेरून आलेल्या एका 41 वर्षीय इसमानं हा हल्ला केलाय. हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसलं,तरी सर्वोच्च न्यायालयानं भटक्या कुत्र्यांविषयी दिलेल्या निर्णयानं नाराज होऊन हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. हल्लेखोरावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासासाठी IB आणि NIAची मदत घेण्यात येतेय. पाहुयात नेमकं काय घडतंय राजधानीत