मुंबई आणि उपनगरात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर इतका प्रचंड आहे की शहरात अनेक ठिकाणी झाड कोसळण्याच्या गंभीर घटना समोर येत आहेत.. चेंबूर येथील 11 नंबर रोडवर एका धावत्या शाळकरी मुलांच्या बसवर अचानक एक झाड कोसळलं. त्यामध्ये एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.