लोणावळा जवळील ऐतिहासिक लोहगड किल्ला सध्या एका वेगळ्याच कारणाने पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय.. केतन अग्रवालला सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी दरीत ढकलून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली.. ही हत्या नेमकी कुठे झाली आणि आरोपींनी केतनला दरीत कसे ढकलले, हे प्रत्यक्ष पाहण्याच्या उत्सुकतेपोटी लोहगडावर पर्यटकांचे पाय मोठ्या संख्येने ओढले जात आहेत...केवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे, तर अगदी दिल्लीसारख्या दूरच्या ठिकाणांवरूनही अनेक पर्यटक या हत्येचा स्पॉट पाहण्यासाठी किल्ल्यावर पोहोचत आहेत. या घटनेमुळे लोहगडावरील गर्दीत लक्षणीय वाढ झालीय..,