ठाकरेंच्या शिवसेनेची धाकधूक अजूनही संपली नाही,6 खासदार, आमदार सचिन अहिर यांच्यानंतर आता विधानसभेचे आमदार आणि मुंबई पालिकेतील नगरसेवक शिंदे गटात जातील अशी चर्चा सुरू झालीय, याचं कारण म्हणजे शिंदे गटाचे आमदारांनी केलेला दावा, सदा सरवणकारांनी 40 ते 45 नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा केलाय, तर एखाद्या दिवशी संजय आमच्यात आले अशी ब्रेकिंग येऊ नये असा दावा अब्दुल सत्तारांनी केलाय.