Chh.Sambhajinagar शहरात नगरसेवकाच्या घराजवळ चोरीचा थरार,नगरसेवक मुन्शी भिकन शेख यांच्या घराजवळ चोरी

छत्रपती संभाजीनगर शहरात नगरसेवकाच्या घराजवळ चोरीचा थरार पाहायला मिळाला.. नगरसेवक मुन्शी भिकन शेख यांच्या घराजवळ उभी असलेली स्कॉर्पिओ चोरण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला.. विशेष म्हणजे मुन्शी यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी घराबाहेर जात, चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण चोरट्यांनी थेट नगरसेवकाच्या अंगावर गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मुन्शी भिकन शेख हे 6 मे रोजी पहाटे आपल्या राहत्या घरी हॉलमध्ये बसलेले असताना, सीसीटीव्ही स्क्रीनवर त्यांना संशयास्पद हालचाल दिसली.. घरासमोर पार्क केलेली स्कॉर्पिओ उघडून एक अज्ञात व्यक्ती आत बसत असल्याचे त्यांना दिसले. शेख यांनी तातडीने घराबाहेर धाव घेतली, मात्र चोरट्यांनी पळ काढण्याच्या नादात त्यांच्या अंगावर गाडी घातली. शेख यांनी प्रसंगावधान राखून बाजूला उडी मारल्याने त्यांचा जीव थोडक्यात वाचला. तर याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भरवस्तीत नगरसेवकावर झालेला हा हल्ला आणि चोरीचा प्रयत्न यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आता या टोळीचा शोध घेत आहेत.

संबंधित व्हिडीओ